Ads

Ads

गृहमंत्री अमित शहा — पुण्यातील मंडलाध्यक्षांशी मनमोकळेपणाने संवाद

पुणे : भारतीय जनता पक्षाची खरी ओळख म्हणजे कार्यकर्त्यांना दिला जाणारा मान आणि संवादाची खुली दारे—हेच जिवंत उदाहरण समोर आले. केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील भाजप मंडलाध्यक्षांना दिल्ली दौऱ्यावर नेण्यात आले आणि त्यांना देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

संसद अधिवेशन सुरू असतानाही अमित शाह यांनी वेळ काढून कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न ऐकले आणि संघटनात्मक कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. स्थानिक पातळीवरील समस्या ते पक्षवाढीपर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी मंडलाध्यक्षांशी मनमोकळा संवाद केला.

या दौऱ्यात संदीप मोझे, रमेश गव्हाणे, नितीन जाधव यांसह पुणे शहरातील सर्व मतदार संघातील मंडलाध्यक्षांनी संसदेच्या कामकाजाचा थेट अनुभव घेतला. हे फक्त एका औपचारिक दौऱ्यापुरते मर्यादित न राहता, एक प्रेरणादायी व अनुभवसमृद्ध प्रवास ठरले. भाजप ही संघटना केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून, मूल्यांवर आधारित, आणि कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी मानणारी व्यवस्था आहे—हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले, अशी भावना केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.

मंडल पातळीवरील कार्यकर्त्यांनाही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे—ही भाजपच्या कार्यसंस्कृतीची मोठी जमेची बाजू आहे. “आज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान नक्कीच वाटतो,” असे लोहगाव मंडलाध्यक्ष संदीप मोझे यांनी मत व्यक्त केले.

Scroll to Top