भारत सरकार व ट्विटर मधील वाद चिघळण्याची शक्यता

नवी दिल्ली — माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांचे ट्विटर खाते सुमारे एक तासासाठी ब्लॉक करण्यात आले होते. याचे कारण अमेरिकी डिजिटल मिलेनिअम कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप होता. प्रसादांनी ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली.
प्रसाद म्हणाले की, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अकाउंट ब्लॉक करणे हे “नवीन माहिती तंत्रज्ञान 2020” च्या नियम 4 चे उल्लंघन आहे.
नवीन माहिती तंत्रज्ञान नियम २०२० या नियमावरून ट्विटर आणि भारत सरकार यांच्यात बराच काळ वाद सुरू झाला आहे. सरकारचे म्हणणे आहे की ट्विटर या नियमांचे पालन करण्यास तयार नाही, परंतु ते बंधनकारक आहेत. सद्य घटनेमुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.






