Ads

Ads

वाघोलीतील मुळीक लक्सरिया विंग बी सोसायटीत १३ केव्ही सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले

वाघोलीतील मुळीक लक्सरिया विंग बी सोसायटीत १३ केव्ही सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. वाढत्या वीजटंचाईच्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करण्याचा आणि सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.

सोलर पॉवर प्लांटचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांचे बंधू अनंता कटके, माजी उपसरपंच समीर (आबा) भाडळे, माजी उपसरपंच मारुती (अण्णा) गाडे तसेच रासप शिरूर तालुकाध्यक्ष शिवाजी कुराडे यांचेसह सोसायटीचे सदस्य उपस्थित होते. हा सौरऊर्जा प्रकल्प सोसायटीला दीर्घकाळ वीज बचतीस हातभार लावणार असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

या प्रकल्पासाठी सिलिको फार्म प्रा.लि. चे सचिन घुले यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र आढाव यांनी केले.

Scroll to Top